असंख्य नवरे बोलत असतील,बायको शिवसेनेसारखी पाहिजे-राणे

Nitesh rane vs Uddhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राला परिचीत असलेला राणे-ठाकरे यांच्यातील वाद नवा नाही.शिवसेना नेते व राणे कुटुंबीय एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिवसेनेचा शेलक्या भाषेत समाचार घेतला आहे.असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखीच पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

आमदार राणेंनी सत्तेच्या सहभागावरून ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेचे वाभाडे काढले.असंख्य नवरे बोलत असतील.. बायको शिवसेनेसारखी पाहिजे!! लफडी कळली तरी सोडत नाही.. जास्तच जास्त तर काय.. एक सामन्यातून अग्रलेख!!बाकी संसार सुरु!! अशी बोचरी टीका राणेंनी केली.या बोचऱ्या टीकेला शिवसेना कशी उत्तर देते हे बघावे लागणार आहे.