अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा …

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता अर्जुन कपूरनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा प्लान शेअर केला होता. यासोबतच त्याचं लग्न गुपचूप होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं होतं. पण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं, सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट केलं. तसेच जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी लग्न करेन असंही त्यानं सांगितलं.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा सध्या बॉलीवूड मध्ये जोरदार सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकानं तिच्या ड्रीम वेडिंगच्या आयडिया शेअर केल्यानंतर हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं मलायकाशी सध्या लग्न करु इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच त्यानं यामागचं कारणही सांगितलं आहे.

Loading...

अर्जुन पुढे म्हणाला की,मी माझ्या वयापेक्षा जास्त समजदार आहे त्यामुळे अनेकदा मला याचा परिणामही भोगावा लागला आहे. लग्न हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे त्यामुळे हा निर्णय मी घाईघाईत घेऊ शकत नाही. योग्य वेळ आल्यावर मी हा निर्णय घेईन आणि जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांना बोलवेन. माझी पूर्ण फॅमिली बिग फॅट वेडिंगमध्ये विश्वास ठेवते. त्यामुळे माझं लग्न छोट्या स्वरुपात होणार नाही. त्यामुळे आता जेव्हा अर्जुनचं लग्न होईल तेव्हा त्याबद्दल सर्वांना समजेल हे नक्की.

आता अर्जुन आणि मलायका यांचे लग्न कसे आणि कधी होते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं