चर्चा तर होणारच! ३७ चेंडूत शतक करून अझरुद्दीनने मिळवले दिग्गज्यांच्या पंगतीत स्थान

ajrdhun

मुंबई : भारतात सध्या सुरु असलेली सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धा युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे गाजत आहे. या स्पर्धेतील बुधवारी(१३ जानेवारी) पार पडलेल्या मुंबई विरुद्ध केरळ सामन्यानंतर देखील २६ वर्षीय युवा खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन चांगलाच चर्चेत आला. त्याने या सामन्यात केवळ ३७ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. याबरोबरच त्याने काही खास विक्रमही केले.

याखेळी अझरुद्दीनने काही खास विक्रम केले आहेत. तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वोच्च खेळी करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी ल्यूक राईटने नाबाद १५३ धावांची खेळी २०१४ मध्ये ससेक्सकडून एसेक्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना केली होती.

याबरोबरच ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला असून त्याने युसुफ पठाणची बरोबरी केली आहे. ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर रिषभ पंत आहे. पंतने दिल्लीकडून हिमाचल प्रदेशविरुद्ध सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत खेळतानाच सन २०१८ ला ३२ चेंडूत शतक केले होते. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने २०१७ साली श्रीलंकाविरुद्ध भारताकडून खेळताना ३५ चेंडूत शतक केले होते.

या यादीतअझरुद्दीन युसुफसह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. युसुफने २०१० ला राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध ३७ चेंडूत शतक केले होते. आता अझरुद्दीननेही ३७ चेंडूत शतक करत त्याची बरोबरी केली आहे. तसेच अझरुद्दीनने केलेला तिसरा मोठा विक्रम म्हणजे तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

महत्वाच्या बातम्या