तलत जानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका ‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’ या मालिकेचा सहदिग्दर्शक तलत जानी यांचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात असतांना त्यांना दोनवेळा ब्रेन हॅमरेजचा झटका आला यातच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या आठवड्यात तलत जानी हे बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. तेव्हा त्यांना आयएएसआयएस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तलत यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेता तुषार कपूरने टि्वटरवरून शोक व्यक्त केला आहे. तुषारने तलत यांच्या सोबत ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या सिनेमात काम केले असून त्यांनी ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘ख्वाहिश’, ‘सन्नाटा: द साइलेंस’, ‘हिना’, ‘ताकत’, ‘रंग’, ‘फतह’ आदी सिनेमांसाठी त्यांनी दिग्दर्शन केले होते.

Latur Advt
Comments
Loading...