चारित्र्याच्या संशय; पतीने केली पत्नीसह मुलाची हत्या

talegaon dabhade husband murderd wife and child

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील कान्हे येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे, हत्या करण्यात आलेल्या पत्नीच नाव रजनी वसंत सातकर ( वय 38) व मुलगा अनुष सातकर ( वय 13) असे आहे. वडगाव मावळ पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे.

आरोपी वसंत सातकर याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच रागातून त्याने रविवारी रात्री मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास धारदार शास्त्राने पत्नी आणि मुलाची हत्या केली. आरोपी वसंत याने रागात आपल्या मुलीवर व पत्नीच्या प्रियकरावरही जीवघेणा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पत्नी रजनी सातकर आणि मुलगा अनुष  यांचा गळा चिरल्याने मृत्यू झाला असून, मुलगी श्रावणी आणि गणेश आंबेकर हे दोघे जखमी झाले आहे. पत्नी रजनी आणि गणेश आंबेकर या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय वसंत सातकर याला होता. आरोपी वसंत सातकर स्वतःहुन पोलीस स्टेशनला हजर झाला त्याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे.