तळीरामांना बुरे दिन : विदेशी दारूच्या उत्पादन शुल्कात वाढ

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातल्या तळीरामांसाठी २०१८ हे साल दारूच्या बाबतीत काहीस स्वस्त ठरल आहे. कारण नवीन वर्षाच्या पहिल्याचदिवशी तळीरामांच्या खिशाला राज्य सरकारने कात्री लावली आहे. राज्य सरकारने विदेशी दारूच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून विदेशी दारू ही 18 ते 20 टक्क्यांनी महागणार आहे.

आतापर्यंत मद्याच्या विक्रीतून सरकारला भरघोस महसूल मिळाला आहे . त्यमुळे कितीही किंमत वाढली तरी तळीराम दारूच्या बाबतीत कसलीही हयगय करत नाही असा समाज असल्याने राज्य सराकारच्या या निर्णयामुळे जवळपास 500 कोटींचा नफा सरकारला होणार असून सरकारी तिजोरीत 500 कोटींचा महसूल जमा होणार आहे. त्यामुळे राज्याच्या सरकारी तिजोरीला अच्छे दिन तर तळीरामांना बुरे दिन येण्याची शक्यता आहे.