तीन विकेट्स घेताच कुलदीप करणार युवराज-बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी

kuldip

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर मात करत दमदार विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार करत १-० अशी आघाडी मिळाली.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत ५० षटकात श्रीलंकेने ९ गडी गमावत २६२ धावांची मजल मारली. श्रीलंकेकडून चमीका करुणारत्नेने ३५ चेंडुत १ चौकार आणि २ षटकारासह सर्वाधीक ४३ धावांची नाबाद खेळी केली. तर भारताकडून दिपक चहर, कुलदीप यादव आणि युजवेद्रं चहलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

कुलदीपने भारतीय संघात कमबॅक करताच जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यात कुलदीपने तिसर्‍या षटकात दोन गडी बाद करत आपल्या कमबॅकचा जोरदार उत्साह साजरा केला. आता दुसऱ्या सामन्यात कुलदीपकडे युवराज तसेच बुमराह यांच्या विक्रमाशी बरोबरी काण्याची संधी आहे.

कुलदीप यादवकडे बुमराह आणि युवराजच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी : 

डाव्या हाताच्या चायनामन गोलंदाजाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली. त्याने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. यादवकडे आता जसप्रीत बुमराहशी सामना करण्याची संधी असेल. बुमराहने एकदिवसीय सामन्यात 108 बळी घेतले आहेत. कुलदीपच्या नावावर 107 बळी आहेत. त्याने तीन विकेट घेतल्यास त्याच्याकडे युवराजसिंसोबत बरोबरी करण्याची संधी असेल. युवराजने वनडेमध्ये 110 बळी घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP