भक्तांच्या भोळेपणाचा फायदा घेत ‘तो’ करायचा रक्ताचा अभिषेक, आता पोलीस कोठडीत

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti

नांदेड :  स्वत:ला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे सांगून गुप्तधन, कुटूंबाच्या भरभराटीसाठी केलेल्या यज्ञात भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करणाऱ्या माहुरमधील कपिले महाराज उर्फ विश्वजित कपिले या भोंदूबाबासह त्याचे दोन भाऊ आणि एक महिला अशा एकाच कुटूंबातील चार जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा जादूटोणा कायदा संदर्भाने गुन्हा दाखल केला. यातील चारही जणांना माहूर पोलिसांनी अटक केली असून गुरुवारी (ता.१४) माहूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.जी. तापडीया यांनी तीन जणांना पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील पूसदचा रहिवासी असलेला कपिले महाराज हा काही वर्षापूर्वी माहूरात दत्त शिखरावर येत होता. त्यानंतर धार्मिक कार्यासाठी दत्तशिखराच्या वतीने मातृतीर्थ परिसरात बाबाला काही जागा देण्यात आली होती. याठिकाणी बाबाने तीन वर्षापूर्वी टीनशेड उभारले होते. याठिकाणी भोंदूबाबाचे अघोरी कृत्य सुरु होते. डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर हे बाबाचे भक्त होते. त्यांना वेगवेगळया पद्धतीने भोंदूबाबाने तब्बल २३ लाख १४ हजार ५४९ रुपयांचा गंडा घातला. शेरकर यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांची भेट घेतली.

प्रविण शेरकर यांच्या तक्रारीवरुन बुधवारी रात्री उशिरा माहूर पोलीस ठाण्यात विश्वजित रामचंद्र कपिले, रवि रामचंद्र कपीले, कैलास रामचंद्र कपीदत्त शिखराले आणि याच कुटूंबातील एक महिला अशा चौघांविरुद्ध विविध कमलांसोबतच जादूटोणाविरोधी कायाद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी भोंदू बाबासह त्याच्या दोन भावांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माहूर यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे हे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या