सरकार स्थापन करतांना जसा सर्वानुमते निर्णय घेतला तसा मराठा आरक्षणाबाबत घ्या, विनोद पाटलांची विनंती

vinod patil

औरंगाबाद: मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काही लागत नाहीये मात्र हा मुद्दा आणखी चिघळत चालला असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी एक विनंती सरकारला केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ज्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी एकत्र येत हायकोर्टच्या निर्णयानुसार मतदान घेत सरकार स्थापन केले. त्याच प्रमाणे महाविकास आघाडी सरकारने आता प्रयत्न करावेत, अशी मागणी पाटील यांनी मंगळवारी केली आहे.

पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा. यासाठी केंद्र सरकारने पीटिशन याचिका दाखल केली. त्यानंतर आम्ही समाजातर्फे पुनर्याचिका दाखल केली. आज राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मला राज्य सरकारला एक विनंती करायची आहे, की देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी जे दोन दिवसांचे सरकार बनवले. त्यानंतर दुसरे सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जे प्रयत्न केले व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदान घेऊन सरकार स्थापन केले, त्याच प्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात पुन्हा एकदा चांगलेच राजकारण तापत आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलने देखील करण्यात येत आहेत. मंगळवारी दि. २२ रोजी शहरात अर्धनग्न आंदोलन करण्याचा असफल प्रयत्न मराठा समाजाकडून करण्यात आला. त्यामुळे आता राज्य आणि केंद्राने मिळून ताकद लावून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP