भाजप आणि काँग्रेसला मुळासकट उखडून टाका

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आवाहन

हैदराबाद: एमआयएम पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. हैदराबादमध्ये जाहीर सभेत बोलत असतांना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यातून भाजप आणि काँग्रेसला मुळासकट उखडून टाका असे आवाहन केले.

कर्नाटक विधानसभेच्या ६० जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय एमआयएमने घेतला असून यामध्ये बहुतेक मुस्लिम बहुल मतदारसंघाचा समावेश आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी यावर्षी निवडणूक होणार आहे.

bagdure

एमआयएम पक्षासोबतची दहा वर्षांची युती तोडण्याचा निर्णय राहुल गांधींनी नुकताच घेतला आहे. त्याचबरोबर एमआयएमच्या जागांवरही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय राहुल यांनी जाहीर केला. त्यामुळे ‘तेलंगणामध्ये आपली लढत शक्तीशाली राजकीय पक्षांशी आहे. भाजप आणि काँग्रेसला तेलंगणातून उखडून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावावी ’ असे आवाहन ओवेसींनी या सभेत कार्यकर्त्यांना केले.

You might also like
Comments
Loading...