दहशतवादी घ्या, कुलभूषण जाधव द्या, प्रस्ताव आल्याचा पाकचा दावा

हेरगिरीच्या आरोपातून पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अटक केली आहे. कुलभूषण यांनी हेरगिरी केल्याची कबुली देत पाकच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता.2014 मध्ये पाकिस्तानातील पेशावरमधल्या आर्मी स्कूलमध्ये गोळीबार करुन चिमुरड्यांचे बळी घेणारा दहशतवादी सध्या अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहे. या दहशतवाद्याचा ताबा पाकिस्तानला देऊन त्याच्या बदल्यात पाककडे असलेले कुलभूषण जाधव यांना देण्याचा प्रस्ताव आल्याचं आसिफ यांनी सांगितलं.

प्रस्ताव देणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तो दहशतवादी कोण आहे, याविषयी मात्र आसिफ यांनी मौन पाळलं आहे.एशिया सोसायटीमध्ये केलेल्या भाषणानंतर आसिफ यांनी उपस्थितांना ही माहिती दिली.पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या मोबदल्यात पेशावरमधील शाळेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला सोडण्याचा प्रस्ताव आल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी केला आहे.

अफगाणिस्तानातील संघर्ष आणि अस्थिरतेमुळे पाकला प्रचंड त्रास होत असल्याचंही आसिफ यांनी सांगितलं. धार्मिक शांतता आणि विकासासाठी पाकिस्तानच्या धोरणांबाबत आसिफ यांनी या परिषदेत मतं मांडली.
त्यांच्या कथित कबुलीजबाबाचा एक व्हिडिओही पाकने शेअर केला आहे. दहा मिनिटांचा हा व्हिडिओ एप्रिल 2017 मध्ये शूट केल्याची माहिती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच देण्यात आली आहे.

2005 आणि 2006 मध्ये आपण कराचीचा दौरा केल्याचे जाधव सांगत असल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओत 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर त्यांना भारतीय गुप्तचर संस्थेने पाकिस्तानात हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं जाधव सांगताना दाखवलं आहे.इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला होता. व्हिएन्ना कराराचा दाखला देत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.