fbpx

सायबर क्राईमसाठी कारणीभूत ठरणाऱ्या हॅकर्सवर कठोर कारवाई करा : अमर साबळे

टीम महाराष्ट्र देशा : देशात सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सायबर क्राईम विभागा अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होत आहे. याबाबत महाराष्ट्रातील खासदार अमर साबळे यांनी राज्यसभेत आवाज उठवला आहे. सायबर क्राईमसाठी कारणीभूत ठरणाऱ्या हॅकर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमर साबळे यांनी केली आहे.

जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि इंटरनेटमध्ये दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहेत. तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. स्मार्ट टीव्ही बेडरुममध्ये असणं धोकादायक आहे. सूरतमध्ये त्याच्या दुरुपयोगाची दोन नवी प्रकरणं समोर आली आहेत. हॅकर्स आता आपल्या बेडरुममध्ये घुसले आहेत. त्यांनी स्मार्ट टीव्ही हॅक करुन पती-पत्नीचा व्हिडीओ बनवला आणि इंटरनेटवर अपलोड केला. ही अतिशय चुकीची बाब आहे, असं खासदार साबळे राज्यसभेत म्हणाले.

दरम्यान गुजरात मधील सुरतमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. हॅकर्सनी स्मार्ट टीव्ही हॅक करुन पती-पत्नीचा खासगी व्हिडीओ बनवला आहे. आणि तो व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केला. आपला व्हिडीओ इंटरनेटवर पाहिल्यावर पती-पत्नी या प्रकरणाची माहिती मिळाली. अशी प्रकरणं समोर येत आहेत, ज्यावरुन समजतं की कोणीही सुरक्षित नाही. हा देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय आहे.