“तिळ गूळ घ्या, मत आम्हालाच द्या”, महिला उमेदवारांचा अनोखा प्रचार

women election gram panchayat

औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी चांगलीच सुरू आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर मकर संक्रांतीचा सण आल्याने मते मागण्यासाठी महिला उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे. त्यानिमित्ताने कंरड्यात हळदी कुंकांची पुढी टाकून आमची आठवण राहू द्या असे म्हणत अनेक महिला उमेदवारांनी प्रचार केल्याचे दिसत आहे.

सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतीत सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक महिला उमेदवार आहेत. यंदा ६१७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. एकूण प्रभाग २०९० प्रभाग पूर्ण ग्रामपंचायतींमध्ये आहेत. निवडणुक रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार आहेत. जिल्ह्यात २ हजार २६१ मतदान केंद्रे आहेत. वैजापूर तालुक्यात १०५ , सिल्लोड ८३, कन्नड ८३, पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयगाव ४०, तर खुलताबाद तालुक्यात 25 ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

सकाळपासून महिला उमेदवारांनी उभे टाकलेल्या आपल्या वार्डातील प्रत्येक महिलांना घरात जाऊन ताई, आजी,आ क्का म्हणत तिळ गुळ घ्या तोंड गोड करा मागले विसरू जा म्हणत मला मतदान करा म्हणत पायावर डोके ठेऊन मतदान मागण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील किती महिला उमेदवारांना संक्रात सण किती गोड ठरणार हे 18 तारखेला मतमोजणीनंतर समजणार आहे. सध्या तरी तिळ गुळ घ्या गोड गोड बोला असं गोड आवाजात महिला उमेदवार महिला मतदारांना बोलताना दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या