संजय राऊत यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा : रावसाहेब दानवे

टीम महाराष्ट्र देशा : संजय राऊत म्हणतात भाजपला सत्तेसाठी वेड लागले आहे. मात्र सत्तेची वाट पाहतानाच संजय राऊतांना वेड लागले आहे. त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. त्यांना काय बोलावे याचे देखील भान राहिले नाही. त्यांना आराम करण्याची गरज आहे. असा टोला भाजपनेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

दानवे म्हणाले, ” शिवसेनेने राज्यपालांना जे पत्र दिले आहे त्यात नेता म्हणून कोणाची निवड केली आहे, त्या नेत्याचे नाव जाहीर केले नाही. तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने अजून गटनेता निवडला नाही. अशा परिस्थिती राज्यपालांनी कोणता निर्णय घ्यावा हा प्रश्न आहे. त्यामुळे राज्यपालांच्या गोंधळात राऊतांनी पडू नये”, असेही दानवे यावेळी म्हणाले आहेत.

Loading...

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात भाजपने सत्ता स्थापना केली आहे. फडणवीस सरकारच राज्याला ५ वर्षे स्थिर सरकार देईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी क्लीन चीटबद्दल विचारताच अजित पवारांच्या क्लीन चीटचा निर्णय कोर्टाचा आहे शासनाचा नाही. असा खुलासाही दानव यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार