याला म्हणतात बदला ! सापाने दंश केला म्हणून त्याने चावून सापाचा फणाच तोडला

टीम महाराष्ट्र देशा : शनिवारी १७ फेब्रुवारीला रुग्णावहिकेच्या १०८ क्रमांकावर एक शेतकरी बेशुद्ध पडला असल्याचा फोन आला होता. त्यानंतर तात्काळ त्या शेतकऱ्याला रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र, तो शेतकरी कसा बेशुध्द झाला याची कल्पना डॉक्टरांना येत नव्हती. पण जेव्हा शेतकरी ‘ सोनपाल’ शुद्धीवर आला तेव्हा त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि एकूण डॉक्टरांना धक्काच बसला. शेतक-यावर उपचार करणारे डॉक्टर संजय कुमार यांनीही आपण आतापर्यंत अशी एकही केस पाहिली नव्हती असं सांगत आश्चर्य व्यक्त केलं. आता नक्की अस काय झालं अन शेतकरी सोनपाल कसा बेशुद्ध झाला याची उत्सुकता तुम्हाला लागली असेलच.

त्याच झालं अस उत्तर प्रदेशातील हरदोई गावातील शेतकरी सोनपाल आपल्या शेतात काम करत असताना त्यांना अचानक एका सापाने दंश केला. अशा स्थितीत घाबरून जाण्याऐवजी संतापाच्या भरात बदला घेण्यासाठी शेतक-याने सापाच्या फण्याचा चावाच घेतला. हा चावा इतका जोरात होता की त्यात सापाचा मृत्यू झाला आणि शेतकरी सोनपाल हा देखील बेशुध्द झाला.

सोनेपाल शुद्धीवर आल्यानंतर नेमकं कशामुळे ते बेशुद्द पडले याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘सापाने मला दंश केला होता. म्हणून मग मी त्याचा फणा चावला. यामुळे सापाचा मृत्यू झाला’, अशी माहिती सोनेपाल यांनी दिली आहे. ‘त्यानंतर मी त्या सापाला गावात आणलं आणि फणा कापून टाकला’, असंही त्यांनी सांगितलं आहे.

bagdure

सापाने दंश केल्यानंतर सोनेपाल यांनी संतापाच्या भरात सापाच्या फण्याचा चावा घेतला. सापाचा चावा घेतल्यानंतर सोनेपाल बेशुद्ध पडले होते. मात्र त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांना त्यांच्या शरिरावर कुठेही सर्पदंश झालेला दिसला नाही.

You might also like
Comments
Loading...