कचराकुंडी सोबत सेल्फी काढा आणि जिंका स्मार्ट फोन

वेबटीम- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजत गाजत स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविले.प्रत्येक शहरात ही  योजना यशस्वी होण्यासाठी काहीना काही शक्कल लढविली जात आहे.अशीच अजब शक्कल झारखंड मधील जमशेदपूर महापालिकेने लढविली आहे.तरुणांना मध्ये असलेली सेल्फीची क्रेझ लक्षात घेता शहरातील कचराकुंडी सोबत चांगला सेल्फी घ्या आणि जिंका स्मार्ट फोन अशी योजना राबविण्यात आली आहे.शहर स्वच्छ व सुंदर राहावे या बरोबरच नागरिकां मध्ये जनजागृती व्हावी या करता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील १० विजेत्यांना गांधी जयंती दिनी पारितोषिक देण्यात येणार आहे.