युद्ध करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा – हौतात्म्यावर शंका घेणं योग्य नाही. राष्ट्रवादी भूमिका घेऊन मोदींना राज ठाकरे यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे .प्रसिद्धीसाठी अशी विधान करणे चुकीचे आहे. पुन्हा एकदा जबरदस्त अश्या प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी युद्ध झालंच पाहिजे. आमची महार बटालियन यात मोलाचा वाटा उचलेल. युद्ध करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे पाकव्याप्त काश्मीर मधून घुसखोरी होते. सरकारच्या पाठीमागे उभा राहण्याची आवश्यकता आहे. या मुद्याचं राजकारण करू नका , असे रामदास आठवले म्हणले. पुलवामा हल्याबाबत आणि राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुण्यात पत्रकार परिषेदेत बोलत होते.

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाईचा पिंपरीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आमची ताकद दाखवून देऊ. लोकसभेची 1 आणि विधानसभेच्या 6-7 जागा देण्याची मागणी यावेळी आठवले यांनी भाजपला केली आहे. तसेच द.मुंबईतील जागा शिवसेनेने आम्हाला सोडावी. जर ही जागा सोडणार नसाल तर ईशान्य मुंबईतील किरीट सोमय्या खासदार असलेली जागा आम्हाला सोडण्याचा आग्रह रामदास आठवले यांच्याकडून केला जात आहे.

Loading...

नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, संगीता आठवले, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी