कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना येड्यांच्या इस्पितळात न्या; विजय वडेट्टीवारांनी सवदीनां झापले

विजय वडेट्टीवा

नागपूर:- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली आहे.

त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवडी यांना फटकारले आहे. मुंबई कर्नाटकचा भाग म्हणणाऱ्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना येड्यांच्या इस्पितळात न्यायला हवं. तसेच बहुभाषक लोकांचा आदर करत सामंजस्याने कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न सोडवावा, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या