औरंगाबाद: आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे न काढल्यास मंदिरात लाऊडस्पीकरून हनुमान चालीसा लावू अशी घोषणा केली होती. या पाश्वर्भूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सध्या राज्यभरात मशिदीवरील भोंगे काढण्यावरून वादंग सुरू असताना भोंगे काढले काय आणि लावले काय आमचे प्रश्न सुटणार आहेत का? तुम्हाला मशीद आणि मंदिरावरील भोंगे लावायचे तेव्हा लावा काढायचे तेव्हा काढा. आमचे प्रश्न मात्र सोडवा. आमचे झाडावर गळफास घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रेत खाली उतरवा, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असा काही कार्यक्रम राबवा, असे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना मी विनंती करतो. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे वाशिम येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी ठेवलेल्या अटी आणि शर्ती –
१) सभा १ मे रोजी दुपारी ४.३० ते रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घ्यावी. या वेळेत बदल करू नये.
२) सभेत आक्षेपाहार्य घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी.
३) शहरात मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
4) सभास्थानाच्या आसन व्यवस्थेची कमाल मर्यादा १५ हजार इतकी आहे. १५ हजारपेक्षा अधिक लोकांना आमंत्रित करू नये.
५) सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म किंवा प्रथा आणि परंपरा यावरून व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होईल, असे चिथावणीखोर भाषण किंवा कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी करू नये.
६) सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आवाज असावा.
महत्वाच्या बातम्या –
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<