राजकारणातील शूर्पणखा होणार नाही याची काळजी घ्या?

राजकारणातील शूर्पणखा होणार नाही याची काळजी घ्या?

Uma Khapre

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा आता चांगलाच गाजतोय. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्याला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले होते. त्यावरुन राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. मात्र, त्यांच्या टिकेला आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपली कारकिर्द काय आणि आपण बोलता काय? असा प्रश्न खापरे यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात उमा खापरे यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खापरे यांनी आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी चाकणकर यांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, ‘आपण कोणाविषयी बोलतोय याचं थोडं भान ठेवा… आपली कारकिर्द काय आपण बोलता काय? राजकारणातील शूर्पणखा होणार नाही याची काळजी घ्या?’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलेली आहे. मात्र, त्यावर अद्याप राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलेला नाही. यावरुन शरद पवार यांनी राज्यपालांना खोचक टोला लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या