कोकणवासियांनो काळजी घ्या ; २ ते ३ दिवस बरसणार अतिमुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

kokan

मुंबई : दोन दिवसांपासून अहोरात्र पडणाऱ्या पावसाने कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून रायगडमधील सावित्री आणि आंबा नद्यांना पूर आला आहे. काळ नदीने पाणीही वेगाने वाढत आहे. पालघरच्या शहरी भागात पाण्याचा निचरा होत नसतानाच जव्हारसारख्या डोंगरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जोरदार वृष्टी सुरूच आहे.

दरम्यान आता भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबईकडून राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी कोकणात 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूरस्थितीनिर्माण होऊ शकते, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. उस्मानाबाद, धुळे, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत आहेत. गावातील अनेक सखल भागात घरांमध्ये तसच बाजारपेठेत पाणी शिरलं असून, नदी पात्रा जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP