Share

Skin Care Tips | ‘या’ टीप्स वापरून हिवाळ्यात तुमच्या त्वचेची घ्या काळजी

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी संपताच सर्वत्र थंडी Winter चा जोर वाढेल. त्याचबरोबर आपल्याला आपल्या त्वचेची Skin जास्त काळजी घ्यावी लागेल. कारण उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात आपल्याला आपल्या त्वचेची जास्त काळजी Care घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये आपली त्वचा ड्राय Dry Skin पडू लागते. हिवाळ्यामध्ये आपल्याला सतत त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी विविध गोष्टींचा उपयोग करावा लागतो. म्हणूनच आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घेता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत.

ही पद्धत वापरून हिवाळ्यात आंघोळ करा

हिवाळ्यामध्ये वाढत्या थंडीमुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते आणि त्यामुळे त्वचेमध्ये असलेले तेल कमी होत जाते. त्यामुळे त्वचेवर कोणताही हार्ष साबण वापरल्यावर आपल्या त्वचा अधिक कोरडी होत जाते. त्यामुळे हिवाळ्यात आंघोळ करताना हार्ष साबण वापरू नका. त्याचबरोबर हिवाळ्यात आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरू नका आणि जास्त वेळ पाण्यात राहू नका. हिवाळ्यामध्ये आंघोळ करत असताना शरीराला खूप जास्त घासू नका. आंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायस ठेवण्यासाठी ओलसर त्वचेवरच मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे.

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावा

हिवाळ्यात सामान्य मॉइश्चरायजर वापरण्याऐवजी ऑइल बेस्ट मॉइश्चरायजर चा वापर करावा. त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही खास रात्री लावण्यासाठी बनवलेले डीप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. यामध्ये प्रामुख्याने हात पाय गुडघे चेहरा इत्यादी गोष्टींना मॉइश्चरायज करावे.

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू द्यायची नसेल तर भरपूर पाणी प्या

तेल आणि मॉइश्चरायझर लावून आपण जशी त्वचेची बाहेरून काळजी घेऊ तसेच त्वचेची आतील बाजूने काळजी घेण्यासाठी मुबलक पाणी प्यायला विसरू नका. जेव्हा आपण हायड्रेट राहतो तेव्हा आपोआप आपली त्वचा हायड्रेट राहून आपण निरोगी राहतो. हिवाळ्यात पाण्याची योग्य प्रमाणात सेवन केल्याने त्वचेवरची कोरडेपणाची समस्या कमी होऊ शकते.

हिवाळ्यात घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावायला विसरू नका

हिवाळ्यात तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा मॉइश्चरायझर बरोबरच तुमच्या त्वचेला सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन तुमच्या त्वचेची अतिरिक्त सूर्य किरणांपासून सुरक्षा करून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी संपताच सर्वत्र थंडी Winter चा जोर वाढेल. त्याचबरोबर आपल्याला आपल्या त्वचेची Skin जास्त काळजी घ्यावी लागेल. …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now