आईवडिलांचा सांभाळ करा, अन्यथा वेतनातून रक्कम कपात

औरंगाबाद : वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यात नकार देणाऱ्या किंवा त्यांची हेळसांड करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम करण्याचा निर्णय औरंगाबाद जिल्हा परिषदेने घेतलाय. या निर्णयाद्वारे कपात केलेली रक्कम वृद्ध आईवडिलांना देण्यात येणारे.

गुरुवारी महसूल प्रबोधिनी सभागृहात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव पारित करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी बैठकीत हा मुद्दा मांडला होता. अनेक जण मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असूनही आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना सन्मानाची वागणूक देत नाही. तर काही जण त्यांचा सांभाळ करत नाहीत. अशावेळी वृद्धांची हेळसांड होते.

या अनुषंगाने जर औरंगाबाद जिल्हा परिषदेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांपैकी कोणी असे करत असल्याची तक्रार प्राप्त झाली, तर त्याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करण्यात येईल. तसेच त्यांच्या आईवडिलांच्या खाती वळती करण्याबाबतचा ठराव अध्यक्षा मीना शेळके यांनी सभागृहात मांडला होता. या ठरावाचे सर्व सदस्यांनी टाळ्यांनी स्वागत करून अध्यक्षांचे अभिनंदन केले व ठराव एकमुखाने पारित केला.

महत्वाच्या बातम्या