‘रस्त्यावरील बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या जड वाहनांचा बंदोबस्त करा’, पैठणकरांची मागणी

औरंगाबाद : पैठण शहरातील नाका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जडवाहानांचे येणे जाणे असते. ते तिथे बेशिस्त पध्दतीने ट्रक उभ्या करत असल्याने वाहातुकीस मोठा आडथडा निर्माण होत आहे. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असून वाहतूक पोलिसांनी याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

पैठण शहरातील नाका रस्त्यावर बांधकाम साहित्य हार्डवेअर तथा जडवाहानांची गॅरेजेस व काही मंगल कार्यालये असल्याने या ठिकाणी वाहातुकीचा मोठा प्रश्न उपस्थीत होत आहे, त्यात या ठिकाणी बांधकाम साहित्य घेऊन येणारे जड वाहाने रस्त्याचा आर्धा भाग व्यापुन आपली वाहने आडवी लावुन माल उतरवत असतात. हा रस्ता शहरात प्रवेश करणारा मुख्यरस्ता असल्याने या ठिकाणी लावल्या जाणाऱ्या मालवाहु जड वाहनाने वाहातुकीस मोठा आडथडा निर्माण होत आहे.

या भागात शहर वाहातुक पोलिसांची दिवसातुन दोन ते तीन वेळा गस्त लावल्यास या ठिकाणच्या वाहातुकीचा प्रश्न संपुष्टात येईल तसेच या ठिकाणी रस्त्यावरच भाजीपाल्याची दुकाने लावली जात असल्याने देखील वाहातुकीस अडथडा होत आहे, जवळपास लॉकडाऊन संपल्याने या भाजीपाला विक्रेत्यांचे भाजीमंडाईत आथवा यात्रा मैदानात स्थलांतर केल्यास या ठिकाणच्या वाहातुकीचा मोठा प्रश्न हलका होऊ शकतो. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP