“बेन स्टोक्सला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घ्या”

ben stoke

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी आपल्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वृत्तानुसार आयपीएल (IPL) 2021 साठी मिनी लिलाव पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. या लिलावात अनेक परदेशी खेळाडू सहभागी होतील. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं.

या लिलाव प्रक्रियेसाठी सर्व फ्रंचायजीने रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. राजस्थान रॉयल्सने धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला कायम राखले आहे. मात्र, त्यानंतरही बेन स्टोक्सला मुंबई संघासाठी खरेदी करा, अशी मागणी एका क्रिकेट चाहत्याने केली आहे. राजस्थान रॉयल्सने केलेल्या एका ट्विटवर कमेंट करत या चाहत्याने ही मागणी केली आहे.

मुंबईकडे अनेक आक्रमक आणि गेमविनर खेळाडू आहेत. यामध्ये कृणाल पंड्या, कायरॉन पोलार्ड, रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक,सूर्यकुमार यादव आणि इशान किशन सारखे तगडे खेळाडू आहेत. यानंतरही या पठ्ठ्याला मुंबईत बेन स्टोक्स हवा आहे. चाहत्याच्या या कमेंटला राजस्थान रॉयल्सने गंमतीशीर प्रत्युत्तर दिलं आहे. नाही,हे अजिबात होऊ शकत नाही, असं म्हणणारी एक gif त्यांनी शेअर करत त्या चाहत्याला उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या