‘नेमाडेंचा ज्ञानपीठ परत घ्या, नेमाडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

नेमाडे

गोंदिया : परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्;याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार म्हणू भालचंद्र नेमाडे परिचित आहेत. त्यांच्या लिखाणावरून नेहमीच वादविवाद सुरु असतात. नेमाडे यांनी कोसला, बिढार, जरीला, हूल, तुकाराम, हिंदू यांसारख्या दर्जेदार ग्रंथांची निर्मिती केली आहे.

‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला २०१४ साली साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या कादंबरीत लभाण-बंजारा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लेखन केले आहे. त्यामुळे हा पुरस्कार परत घेण्याची मागणी वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटनेकडून केली जात आहे. ‘लेखक नेमाडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच त्यांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकारला तसेच ज्ञानपीठ पुरस्कार समितीला शिफारस करावी. कादंबरीच्या विक्रीवर तत्काळ बंदी आणावी अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे.

‘या कादंबरीत हरीपुरा या लभाण समाजाच्या तांड्याचे वर्णन लेखकाने केले आहे. यात स्त्रियांविषयी अत्यंत अश्लील व बीभत्स स्वरूपाचे लेखन करून अखिल भारतीय स्तरावरील सुमारे १२ कोटी समाजबांधवांच्या भावना दुखविण्याचे कार्य लेखकाने हेतुपुरस्सर केले आहे. यामुळे समाजातील सांस्कृतिक मूल्याला ठेच पोहोचली आहे. या लेखनाचा समाजात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. ही कादंबरी त्रिखंडात्मक असल्याचा उल्लेख स्वतः लेखकाने केला आहे. मग अपूर्ण कादंबरीच्या पहिल्याच खंडाला ज्ञानपीठ पुरस्कार कसा देण्यात आला, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुरस्कार निवड समितीला दूषित भावनेतून केलेले लेखन कसे दिसले नाही, असा आरोप वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटनेने केला आहे.

महत्वाच्या बातम्या