Video- खोटे गुन्हे मागे घ्या; संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ पुण्यात ठिय्या मोर्चा

पुणे: कोरेगाव भीमा हिंसाचारात विनाकारण संभाजी भिडे गुरुजींना गोवण्यात आला असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आज पुण्यामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

Loading...

भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ शनिवारवाडा येथून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र,पोलिसांनी परवानगी नाकारल्याने समर्थकांकडून नदी पत्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. एकबोटे यांना अटक करण्यात आली. मात्र संभाजी भिडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. दरम्यान. संभाजी भिडेंना देखील अटक करण्याची मागणी करत प्रकाश आबेंडकर यांनी मुंबईमध्ये एल्गार परिषद घेतली होती. आज संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.Loading…


Loading…

Loading...