साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी सरकारच्या योजनेचा लाभ घ्या

टीम महाराष्ट्र देशा : साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना असे या योजनेचे नाव आहे. शासन निर्णय क्रमांक यंत्रमाग-२०१३/प्र.क्र.२५३/टेक्स-2,दि.28 प्रिल,२०१४ ही योजने बद्दलचा शासन निर्णय आहे. साध्या यंत्रमागाना अतिरिक्त तंत्राची जोड देऊन यंत्रमागाचा दर्जा वाढविणे असा या योजनेचा उद्देश आहे.

साध्या यंत्रमाग धारकांसाठी लागू आहे. यंत्रमागधारकाला केंद्र शासनाने अनुदान मंजूर केलेले असावे, वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यास तपासणीकरिता यंत्रमाग उपलब्ध करून द्यावे लागेल, यंत्रमागधारकांनी अनुदान मागणी प्रस्तावासोबत आपले ओळखपत्र (निवडणूक पत्र, आधार कार्ड, विद्युत बिल अथवा राज्य शासनाने मान्य केलेले इतर ओळखपत्र) सादर करणे आवश्यक राहील, यंत्रमाग विद्युत पुरवठाबाबत वीज बिल प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील अशा प्रमुख अटी आहे.

केंद्र शासनाने अनुदानाची रक्कम मंजूर केलेल्या आदेशाच्या प्रतीसह अनुदान मागणीचा प्रस्ताव, यंत्रमागधारकांनी अनुदान मागणी प्रस्तावासोबत आपले ओळखपत्र (निवडणूक पत्र, आधार कार्ड, विद्युत बिल अथवा राज्य शासनाने मान्य केलेले इतर ओळखपत्र) सादर करणे आवश्यक राहील अशी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लागतात.

प्रति यंत्रमाग एकूण खर्चाच्या ३३.३३% किंवा कमाल मर्यादा रु.१०,००० /- पर्यंत जि कमी असेल याप्रमाणे 8 यंत्रमागास रु.80,०००/- प्रति यंत्रमागधारक इतके अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत, असे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप आहे.

केंद्र शासनाने अनुदानाची रक्कम मंजूर केलेल्या आदेशाच्या प्रतीसह अनुदान मागणी प्रस्ताव वस्त्रोद्योग संचालकास सादर करावा. संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय , नागपूर असे संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता आहे.

महत्वाच्या बातम्या