जीवनावश्यक वस्तूची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार

जालना : जिल्ह्यातील बरेचसे जीवनावश्यक वस्तूचे व किराणा मालाची दुकाने बंद असलेबाबत व जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विक्री करत असलेबाबत (विशेषतः भाजीपाला, कांदे , बटाटे) याबाबत तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी आपले जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाचे दुकान तात्काळ उघडे ठेवावेत व गरजू ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू योग्य दराने पुरवठा करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले आहेत.

कोणीही जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व कांदे बटाटे जादा दराने विक्री करू नये. अन्यथा सदर व्यापाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधीत व्यापारी,दुकानदार , व्यक्ती व संस्था यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Loading...

सर्व तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंचे घाऊक व किरकोळ दुकाने चालू/ उघडी आहेत का? याची खात्री करावी तसेच कोणतीही जीवनावश्यक वस्तू अथवा भाजीपाला, कांदे, बटाटा यांची चढ्या दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिल्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'