भाजपचा प्रचार करणाऱ्या अंकिता पाटलांवर कारवाई करा

टीम महाराष्ट्र देशा : इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांच्यात लढत होत आहे. परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या कॉंग्रेसतर्फे जिल्हापरिषदेच्या सदस्या आहेत. त्या सोशल मिडीयावर हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहे.

याविषयी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परंतु त्यांच्या कन्या अंकिता पाटील या कॉंग्रेसची सदस्य आहे. तसेच त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. परंतु अंकिता पाटील या सोशल मिडीयावर भाजपचा प्रचार करतात. त्यामुळे माझी कॉंग्रेसच्या कमिटीकडे मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं विधान केले आहे.

पुढे बोलताना बालगुडे यांनी ‘जर तुम्ही कॉंग्रेसच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सदस्या आहात तर तुम्ही फेसबुकवर भाजपच्या पोस्ट कशा करू शकता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांनी अंकिता पाटील यांच्यावर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी केली आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी जागावाटपात इंदापूरची जागा कॉंग्रेसला न मिळाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांनाच यंदा राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या