‘लॉकडाऊनमुळे ‘त्यांच्या’वर आत्महत्येची वेळ येऊ शकते’

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर आता कुठे गरीब नागरिकांचे आयुष्य पूर्वपदावर येत आहे. अशात पुन्हा लॉकडाऊन लावणे हे गरिबांना परवडणारे नाही. विनाकारण नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्यांवर कारवाई करा. परंतू लॉकडाऊन लावू नका अशा मागणीचे निवेदन रिक्षाचालक-मालक कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोचा कहर सुरू असताना लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब कष्टकरी पूर्णपणे डबघाईला आले आहे. यामुळे मध्यमवर्गीय देखील त्रस्त आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन लावल्यास त्यांच्यावर आत्महत्येचा प्रसंग ओढवू शकतो.

त्यामुळे विनाकारण बाजारपेठेत फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा. परंतू लॉकडाऊन लावू नका. त्यामुळे गरीब, मजूर, सामान्य व्यक्ती भरडून निघेल. त्यामुळे लॉकडाउन लावण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे रिक्षाचालक-मालक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या