भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – नवाब मलिक

navab malik

मुंबई  – भाजप भंडारा-गोंदियामध्ये साम-दाम-दंडभेदाचा वापर करुन पोटनिवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असून शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला गेला हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आणि भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

भंडारा-गोंदियामध्ये सहा महिन्यापूर्वी झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई निवडणूक आचारसंहिता काळात ट्रेझरीमध्ये जमा करुन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे काल रात्रीच तक्रार देण्यात आली असून याची प्रत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. यावेळी नवाब मलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी उपनिबंधकांना काढलेल्या आदेशाच्या पत्राची प्रत मिडियाला दिली.

navab malik

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची विरोधकांनी विधानसभेत मागणी केल्यानंतर ही नुकसान भरपाई देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र सहा महिने उलटून गेले तरी ही नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला होता त्यामुळेच सरकारकडून भंडारा-गोंदिया निवडणूक कालावधीत अचानक या नुकसानभरपाईची रक्कम ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर सरकारी पैसे वाटता येत नाहीत. परंतु निवडणूक जिंकता येत नसल्याचे लक्षात येताच त्या मानसिकेतमधून भाजपकडून हा प्रकार करण्यात आला आहे