शरद पवार यांच्या हत्येची चिथावणी देणा-यावर कारवाई करा – जितेंद्र आव्हाड

Devendra Fadnavis for Maharashtra

टीम महाराष्ट्र देशा :  देशहितासाठी शरद पवार यांच्या सारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणा-या माथेफिरुवर गुन्हा दाखल करावा; अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्रा’ या फेसबुकवर पेजवर भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर या मथळ्याखाली एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टवर कमेंट करताना अवधूत प्रकाशराव शिंदे याने देशहितासाठी शरद पवार यांच्या सारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही, अशी चिथावणीखोर भाषा वापरली आहे.

शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावरचे महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या हितसाठी उभे आयुष्य वेचले आहे. त्यांच्याबद्दलची अशी पोस्ट टाकणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ही धमकीवजा पोस्ट गांभीर्याने घेऊन संबधितांवर तत्काळ भादंवि १०७(१) आणि ११५ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.

Loading...

अशा पद्धतीची पोस्ट मी माझ्या राजकीय जीवनात पाहिलेली नाही. पुरोगामी महाराष्ट्रात अशी चिथावणी देणा-यांवर कारवाई करावी, याचसाठी आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिले आहे, असेही आ. आव्हाड यांनी सांगितले.Devendra Fadnavis for Maharashtra

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर