‘रेमडेसिवीर वाटप प्रकरणी शरद पवार, रोहित पवारांवर कारवाई करा’, हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी

औरंगाबाद : राज्यात विविध ठिकाणी राजकीय लोकांनी जसे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शरद पवार व रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांनी कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे.

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचं वाटप केले होते. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या प्रकरणात याचिकाकर्त्याकडून याचिकेत सुधारणा करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. वरील विनंती करण्यात आली आहे.

खासदार सुजय विखे पाटील यांच्याप्रमाणे अनेक राजकारण्यांनी रेमडेसिवीरचे खासगीरित्या वाटप केले. त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्याकडून करण्यात आली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्यात दीड हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप केले. माजी आमदार चंद्रकांत रघुवंषी यांनीही सहा हजार रेमडेसिवीरचे वाटप केलं.

त्याचप्रमाणे आमदार अमरीश पटेल आणि आमदार रोहित पवार यांनीही खासगीरित्या रेमडेसिवीरचे वाटप केले. या सर्वांवरही कारवाई करण्याचे आदेश द्यावेत असं याचिकाकर्त्यांनी अर्जात मागणी केली आहे. या प्रकरणात खोटे पेपरही बनवण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर फोर्जरी कलमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही केली आहे.

महत्वाच्या बातम्या