भारताच्या दबावामुळे माझ्यावर कारवाई ; हाफिज सईद

hafij said

टीम महाराष्ट्र देशा : भारत आणि अमेरिका यांच्या दबावामुळे माझ्या पक्षाविरोधात कारवाई होत असल्याचे जमात उद दावाचा हाफिज सईद याने बीबीसी ला  दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. काही राजकीय लोकांनी माझ्या विरुद्ध प्रचाराची मोहीम उघडल आहे. अमेरिकेच्या दबावामुळे सर्व गोष्टी होत आहेत. भारत हे सगळं करत आहे आणि आता आमचे संरक्षण मंत्रीसुद्धा त्यांच्या बाजूनेच बोलत आहेत.

तो समोर म्हणाला, न्यायालयानं माझी नेहमीच निर्दोष मुक्तता केली आहे. पण काही राजकीय लोक त्यांच्या अजेंड्यावर काम करत आहेत आणि म्हणून माझ्याविरोधात मोहीम सुरू आहे.अमेरिके संदर्भात बोलतांना सईद म्हणाला अमेरिकेबरोबर आमचं कोणतंच भांडण नसून आमच्यात काही वैमनस्य नाही. विरोधात कोणी असेल तर तो भारत आहे आणि भारत अमेरिकेला उद्युक्त करू शकतो.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी बीबीसी सोबत बोलतांना सांगितल. हाफिज सईद यांच्याविरुद्धची कारवाई ही ‘ऑपरेशन रद्द- उल- फसाद’ चा भाग आहे.