fbpx

आयसीसीने भारतीय संघाविरुद्ध कारवाई करावी : पाकिस्तान

टीम महाराष्ट्र देशा : रांची येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये भारतीय संघाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून आर्मीच्या रंगाची कॅप वापरल्या होत्या. भारतीय संघाने आर्मी कॅप घालून या सामन्यात खेळण्यावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी आयसीसीने भारतीय संघाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तान मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कुरेशी म्हणाले की,  ‘पूर्ण जगाने पाहिले की भारतीय संघ त्यांची नेहमीची कॅप न घालता ‘आर्मी कॅप’ घालून खेळले. पण हे आयसीसीने पाहिले का? आम्हाला असे वाटते की पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ही गोष्ट पुढे आणण्यापेक्षा आयसीसीवर याकडे लक्ष देण्याची जबाबदारी आहे.

तसेच पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनीही याबद्दल ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे. तर ते ट्वीट मध्ये असे म्हणाले की, ‘हे फक्त क्रिकेट नाही, मला आशा आहे की आयसीसी याबद्दल कारवाई करेल. जर भारतीय संघाने ही गोष्ट थांबवली नाही तर पाकिस्तान क्रिकेट संघही काश्मिरमध्ये भारताकडून होणाऱ्या आत्याचाराबद्दल काळी पट्टी बांधून जगाला आठवण करुन देईल.’

1 Comment

Click here to post a comment