‘त्या’ निर्लज्ज भाजपा पदाधिकाऱ्यावर कारवाई करा

टीम महाराष्ट्र देशा- नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्याने महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. राज्यात महिला पोलिस अधिकारीही सुरक्षित नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

भाजपच्या या निर्लज्ज पदाधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर, प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे व सर्व विभागीय अध्यक्षांसह थेट नागपूर येथील पोलिस आयुक्त कार्यालयास धडक देत या भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकारामुळे पोलिसांचे मनोधैर्य खालावते आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी या निर्लज्ज भाजपा पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.