fbpx

कॅबिनेटची बैठक वर्षातून एकदातरी रायगडावर घ्या – खा. संभाजीराजे

Sambhaji Raje Bhosale

टीम महाराष्ट्र देशा- राज्य समजून घ्यायचे असेल तर कॅबिनेटची बैठक वर्षांतून एकदातरी रायगडावर किल्ल्यावर घेतली पाहिजे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कसे होते आणि ते कसे चालवले जात होते याची कल्पना मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये असणाऱ्या मंत्र्यांना येईल.अशी मागणी खासदार संभाजी राजे भोसले यांनी केली आहे. आज स्वराज्य शपथदिनानिमित्त भोसले हे रायरेश्वर मंदिरात आले असता त्यांनी ही मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजी राजे ?
राज्य समजून घ्यायचे असेल तर कॅबिनेटची बैठक वर्षांतून एकदातरी रायगडावर किल्ल्यावर घेतली पाहिजे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कसे होते आणि ते कसे चालवले जात होते याची कल्पना मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये असणाऱ्या मंत्र्यांना येईल.फक्त शिवाजी महाराज की जय म्हणून काम चालणार नाही त्यासाठी रायगडावर कॅबिनेट झालीच पाहिजे याबाबत तशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.