लाडक्या तैमूर अली खानचा ड्रम वाजवताना व्हिडिओ व्हायरल

blank

मुंबई : स्टार किडमध्ये तैमूर हा हॉट फेव्हरेट मुलगा आहे. तैमूरच्या जन्मापासूनच सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये तो चर्चेत असतो. तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ ला झाला. नुकताच त्याने आपला वाढदिवस साजरा केला. तैमुर वयाने लहान जरी असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही.

तैमुर संदर्भातल्या बातम्या वाचणं काहींना बऱ्याचदा आवडत नाही. अशा बातम्यांवर अनेकजण राग व्यक्त करताना दिसतात. पण अनेकांना छोट्या तैमुर बद्दल उत्सुकताही असते. याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.

सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुर हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायमच चर्चेत असतो. तैमूर आपल्या घरातून बाहेर येताच मीडियाचे सर्व कॅमेरे त्याला कॅप्चर करण्यासाठी असतात. त्याचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत.आताही तैमुर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

आता तैमूर अली खानचा पुन्हा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ड्रम वाजवताना दिसत आहे. तैरलूचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की पापा सैफ अली खानला गिटार आवडतो. तर तैमूरला ड्रम वाजवायला आवडते.