माढा येथे तहसिल कार्यालय बंद …

कुर्डूवाडी प्रतिनीधी – हर्षल बागल : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईने आत्ता वेगळे रुप घेतले असुन माढा तहसिल कार्यालयाला सकल मराठा क्रांती मोर्चा ने कुलुप घातले . कुलुप घालण्याआदी मराठा महिलांनी अधिकाऱ्यांना पुष्प देऊन गनिमी कावा करित तहसिल कार्यालय बंद केले. अधिकाऱ्यांनी देखील मराठा समाजाच्या भावनेचा आदर करित काम बंद आंदोलन केले.

गेले सात दिवसापासुन माढा तहसिल कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आज भोसरे जिल्हा परिषद गटाची तारिख होती. यावेळी भोसरे जिल्हा परिषद गटातील सर्व पक्षीय लोक यावेळी ऊपस्थित होते.
राज्यातील पहिलं तहसिल कार्यालय माढा येथे मराठा समाजाने बंद केले. यामुळे राज्यीत आत्ता सरकारी कार्यालयांना मराठा समाजाने टार्गेट केले असल्याने सरकार समोर अडचणी वाढल्या आहेत.

मराठा समाजाचा तात्काळ ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण द्या : आ.भुमरे

सकल मराठा समाज आणि इतर संघटनांकडून पारनेर तालुका बंदची घोषणा