जालना: आरोग्यमंत्री राजेश टोपे हे काल खासदार इम्तियाझ जलील यांच्या भेटीसाठी औरंगाबाद मध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर बोलताना जलील म्हणाले, “उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप एमआयएमवर करण्यात आला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्ताव देतोय”. तसेच पुढे ते महाविकास आघाडीला उद्देशून असेही म्हणाले कि, “तुमच्या तीनचाकी रिक्षाला अजून एक चाक जोडा, मोटर कार करा, मग बघा कशी चालते”. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
एमआयएमचा हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावला आहे. “एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील”, असे विधान टोपे यांनी केले आहे. याबद्दल त्यांनी पुढे सांगितले कि जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी फक्त प्रस्ताव ठेवला. मी फक्त ऐकून घेतलं. दॅट्स ऑल. परंतु टोपेंच्या या विधानामुळे एमआयएम महविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या प्रस्तावानंतर “शिवसेना हिरवी सेना झाली” अशी टीका भाजपकडून करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या: