तैमूर …बस नाम ही काफी हैं

blank

मुंबई : स्टार किडमध्ये तैमूर हा हॉट फेव्हरेट मुलगा आहे. तैमूरच्या जन्मापासूनच सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये तो चर्चेत असतो. तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ ला झाला. नुकताच त्याने आपला दुसरा वाढदिवस साजरा केला. तैमुर आज दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही.

blank

तैमुर संदर्भातल्या बातम्या वाचणं काहींना बऱ्याचदा आवडत नाही. अशा बातम्यांवर अनेकजण राग व्यक्त करताना दिसतात. पण अनेकांना दीड वर्षाच्या तैमुर बद्दल उत्सुकताही असते. याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनाही तैमूरची भुरळ पडली आहे.

blank

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार,मधूर यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी एक नाव रजिस्टर केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘तैमूर’. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. त्यामुळे येत्या दिवसांत आपल्या करिना व सैफच्या लाडक्या मुलाच्या नावाचा चित्रपट पाहायला मळणार आहे. दोन वर्षांच्या तैमूरची ही मोठी उपलब्धी मानावी लागेल.