Share

T20 World Cup | टी 20 विश्वचषक विजेत्यास मिळणार ‘एवढी’ रक्कम ; IPL बक्षीस रक्कमेसोबत बरोबरी सुद्धा होऊ शकणार नाही

टीम महाराष्ट्र देशा: आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी (ICC) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) चा अंतिम सामना पार पडणार आहे. या अंतिम सामन्यांमध्ये इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी दुसऱ्या विजेतेपदावर दोन्ही संघाची नजर आहे. कारण पाकिस्तान संघाने 2019 मध्ये जेतेपद पटकावले होते. तर, एका वर्षानंतर लगेचच इंग्लंडने ट्रॉफी जिंकली होती. तर दुसरीकडे भारत जरी या स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी भारतीय क्रिकेट चाहते हा सामना बघायला उत्सुक आहेत. त्याचबरोबर आजच्या सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड हा किताब जिंकण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यांना ट्रॉफी बरोबरच मोठी रक्कम देखील बक्षीस म्हणून मिळणार आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धा 2022 जिंकणाऱ्या संघाला तब्बल 1.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयानुसार 13.03 कोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. त्याचबरोबर उपविजेत्या संघाला 0.8 दशलक्ष डॉलर म्हणजेच 6.5 कोटी रक्कम बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. दरम्यान, टी 20 विश्वचषक सामन्याची बक्षीस रक्कम किती मोठी असली तरी ती आयपीएल लीगच्या बक्षीस रक्कमेपेक्षा कमीच आहे.

IPL 2022 चा विजेता संघ ‘गुजरात टायटन्स’ला 20 कोटी रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आली होती. म्हणजेच विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेपेक्षा आयपीएलची रक्कम जवळपास 7 कोटींपेक्षा अधिक आहे. त्याचबरोबर पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2022 मधील विजेता संघ ‘लाहोर कलंदर’ला बक्षीस म्हणून 3.40 कोटी रुपये मिळाले होते. तर कॅरिबियन प्रीमियर लीग चा विजेत्याला 8.14 कोटी रुपये रक्कम बक्षीस स्वरूपात मिळाली होती.

त्याचबरोबर बांगलादेश प्रीमियर लीगच्या विजेत्यांना 6.92 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीगच्या चॅम्पियन्सना 3.66 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. दरम्यान, आयसीसी ने केलेल्या घोषणेनुसार टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये पात्र ठरलेल्या चारही संघांना 4 लाख डॉलर म्हणजे जवळपास 3 कोटी 25 लाख रुपये मिळणार आहेत. तर, सुपर 12 स्टेज मधील चार विजेत्यांना 40 हजार डॉलर्स बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला अतिरिक्त 1.28 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी (ICC) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) चा अंतिम सामना पार पडणार आहे. …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now