टी-20 विश्वचषक : गौतम गंभीरच्या ड्रीम इलेव्हनमधून अश्विनला डच्चू

gambhir

मुंबई : 8 सप्टेंबर रोजी आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टी 20 साठी निवडलेल्या संघात काही खेळाडूंना प्रथमच संधी देण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या आयसीसीच्या या मेगा इव्हेंटसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघात अशा सात खेळाडूंना स्थान दिले आहे, जे पहिल्यांदा टी -20 विश्वचषकात खेळतील.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यामुळे संघ संतुलित दिसत आहे. यात 8 खेळाडू असेही आहेत ज्यांना टी 20 विश्वचषक खेळण्याचा अनुभव आहे आणि 7 खेळाडू असे आहेत जे प्रथमच निळ्या जर्सीमध्ये दिसतील. टी 20 विश्वचषकाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. टीम इंडिया 24 ऑक्टोबरला आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाची घोषणाही झालेली आहे. मात्र प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाचा समावेश होणार आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.

दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. गौतम गंभीने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनचा समावेश केलेला नाही. गंभीरने अश्विनच्या जागी मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिले आहे.

एका प्रसिद्ध वहिनीला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने त्याच्या प्लेइंग इलेव्हनचा खुलासा केला आहे. त्याने एल राहुल आणि रोहित शर्माला सलामीवीर म्हणून निवडले. तर त्याने तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची निवड केली. सूर्यकुमार यादव 4 व्या स्थानावर, भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत 5 व्या स्थानावर असावा. हार्दिक पंड्याला सहाव्या क्रमांकावर तर रवींद्र जडेजाला सातव्या क्रमांकावर निवडले. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला 8 व्या क्रमांकावर स्थान दिलं आहे.

आणि मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला 9 व्या क्रमांकावर, मोहम्मद शमीला 10 व्या क्रमांकावर आणि जसप्रीत बुमराहला 11 व्या क्रमांकावर निवडले. फिरकीपटू म्हणून गंभीरने केवळ वरुण चक्रवर्तीचीच निवड केली.

गौतम गंभीरने निवडलेली संभाव्य टीम 

के एल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह

महत्त्वाच्या बातम्या