‘टी -20 विश्वचषक आणि ॲशेस दौरा महत्वाचा’; इंग्लंडच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाने सांगितले आयपीएल न खेळण्याचे कारण 

delhi capitals

नवी दिल्ली : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यातून म्हणजेच आयपीएलच्या 14 व्या हंगामातून  ऐनवेळी माघार घेतली. अचानक आयपीएल मधून माघार घेण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा धुरंदर खेळाडूने केला आहे. सलग एकापाठोपाठ एक स्पर्धा असल्याने आणि जे इंग्लंडसाठी खूप महत्वाचे असल्याने आपण आयपीएलच्या उर्वरित सामने खेळत नसल्याचा त्याने खुलासा केला आहे. ख्रिस वोक्स आयपीएल 2021 साठी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.

32 वर्षीय ख्रिस वोक्स इंग्लंडच्या त्या खेळाडूंपैकी होता ज्यांनी गेल्या शुक्रवारी भारताने पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिल्याने आयपीएल खेळण्यास निकर दिला होता. ख्रिस वोक्स सोबतच इंग्लडच्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी आयपीएलमधून माघार घेतली होती. ऑक्टोबरमध्ये टी -20 विश्वचषकासाठी आणि थोड्याच वेळात अॅशेस दौऱ्यामुळे, वोक्सने दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणे नाकारले असल्याचे त्याने स्पष्ट केले.

या आठवड्यात द गार्डियनशी बोलताना ख्रिस वोक्स म्हणाला, ‘विश्वचषक संघात माझा समावेश झाला आहे, मला माहित नव्हते की हे होणार आहे. टी -20 विश्वचषक आणि अॅशेस, दौऱ्यामुळे आयपीएल खेळाता येणार नाही. मला आयपीएलचा भाग व्हायला आवडले असते, पण विश्वचषक आणि एक अॅशेस दौरा इंग्लंडसही महत्वाचा आहे.

महत्वाच्या बातम्या :