Share

IND vs PAK | मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याच्या वेळेपासून ते प्लेइंग 11, जाणून घ्या प्रत्येक अपडेट

IND vs PAK T20 world cup 2022 नवी दिल्ली : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आज T20 विश्वचषक (T20 world cup 2022) सुपर 12 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ‘ब्लॉकबस्टर’ सामना खेळत आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. या वर्षातील दोन्ही संघांची ही तिसरी भेट आहे. याआधी नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत दोघेही दोनदा आमने-सामने आले होते. दरम्यान या पावसावर पावसाचे संकट आहे. पाकिस्तानचा संघ अजूनही ऑस्ट्रेलियातील T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 International Cricket) पहिल्या विजयाची वाट पाहत आहे.

सामना किती षटकांचा असेल?-

मेलबर्नमधील हवामान कालच्या म्हणजेच शनिवारपेक्षा चांगले आहे परंतु आकाश काळ्या ढगांनी झाकलेले आहे. अशा परिस्थितीत हा सामना किती षटकांचा असेल असा प्रश्न पडतो. काळे ढग असूनही, आज सकाळपासून पाऊस पडला नाही, त्यामुळे चाहते पूर्ण 20 षटकांच्या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

येथे पाहा सामना-

T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 12 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण Disney + Hotstar वर केले जाईल.

हवामान कसे असेल-

मेलबर्नमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. Weather.com च्या मते, रविवारीही पावसाची शक्यता आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता सुरू होणार असला तरी मेलबर्नमध्ये त्यावेळी रात्रीचे 7 वाजले असतील. मेलबर्नमध्ये रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारताचे पारडे जड-

T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 5 सामने एकतर्फी जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानी संघाला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. यावेळी पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाकडे असे अनेक स्टार खेळाडू आहेत, जे त्यांना विजय मिळवून देऊ शकतात.

या खेळाडूंमुळे संभ्रम-

भारतीय संघात चार वेगवान गोलंदाज आहेत. यामध्ये भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. आता यापैकी कर्णधार रोहित शर्मा कोणाला संधी देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन्ही देशांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तानी संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद

महत्वाच्या बातम्या :

IND vs PAK T20 world cup 2022 नवी दिल्ली : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आज T20 …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now