Share

T20 WC 2022 | “आम्ही त्याला…” ; उपांत्य फेरीपूर्वी बेन स्टोक्सचे सूर्यकुमारबाबत मोठे विधान

T20 WC 2022 | टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारताशिवाय इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सूर्यकुमार यादव चे जोरदार कौतुक केले आहे.

सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना स्टोक्स म्हणाला, “सूर्यकुमार यादव खूप हुशार आहे, जेव्हा तो काही शॉट्स खेळतो की आपण विचारही नाही करु शकत. सूर्यकुमार खरोखरच क्रिकेट विश्वात चमकला आहे. तो एक हुशार खेळाडू आहे. तो असे काही फटके खेळतो की आपण डोक्याला हात लावतो. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, परंतु आशा आहे की आम्ही त्याला रोखू शकू आणि त्याला मुक्तपणे खेळू देणार नाही.”

सूर्यकुमार यादव ची वादळी खेळी-

सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर आपल्या बॅटने वादळ निर्माण केले. या सामन्यात त्याने 25 चेंडूत 61 धावांची जलद खेळी खेळली. सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.

सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक 2022 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात 3 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 225 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 75 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर त्याने या विश्वचषकात 193 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

T20 WC 2022 | टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारताशिवाय इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now