fbpx

India vs England t20 : भारताचा सामना तगड्या इंग्लंडशी

 टीम महाराष्ट्र देशा : आर्यलंड दौऱ्यात विजयी झाल्यानंतर टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर होणार आहे.

इंग्लंड सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे आजच्या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या कामगिरीत सातत्य राखले आहे. वन-डे विश्वकप २०१९ च्या पार्श्वभूमीवर ही मालिका संघासाठी उत्तम संधी आहे.

भारताने गेल्या टी-२० सामन्यांपैकी १५ सामन्यांत विजय मिळवल्याने संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. इंग्लंड संघातील काही खेळाडूंना मागच्या मालिकेत सूर गवसला आहे. विराट कोहलीने याकडे कानाडोळाकरून चालणार नाही.जसप्रीत बुमराहच्या अंगठ्याला झालेली दुखापत संघासाठी चिंतेचा विषय झाला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी नवीन खेळाडू दीपक चहरला तर वाॅशिग्टन सुंदरच्या जागी अष्टपैलू कुणाल पंड्याचा समावेश करण्यात आला आहे.

सामना आज रात्री १० वाजता भारतीय वेळेनुसार होणार आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची वन-डे मालिका १२ जुलैला होणार आहे. आजच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे-

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल आणि उमेश यादव.

इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टा, जॅक बाल, जोस बटलर, सॅम कुरेन, अॅरलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन राय, डेव्हिड विली आणि डेव्हिड मलान.

हे आहेत क्रिकेट जगातील सर्वात चलाख खेळाडू

नरेंद्र मोदींचा हा दौरा म्हणजे ‘शेवटच्या षटकात होणारी महेंद्र सिंह धोनीची एन्ट्रीच’

फिफा वर्ल्ड कप 2019 : विजय जल्लोष साजरा केल्यानंतर मॅराडोना पडला बेशुद्ध