‘इंग्लंडच्या पराभवाला टी-२० लीग जबाबदार’ केवीन पीटरसनने मांडले मत

kevin petersan

मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाहुण्या न्युझीलंडने यजमान इंग्लंड संघाचा 8 गडी राखुन पराभव केला आहे. या विजयासह न्युझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.

न्युझीलंडच्या संघाने प्रमुख खेळाडुंच्या अनुपस्थितीत इंग्लंडला चार दिवसात पराभुत केले. यानंतर इंग्लंडच्या संघाचा माजी क्रिकेटपटु केवीन पीटरसनने इंग्लंडच्या पराभवाला टी-२० लीग जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याने ट्विट करत लिहीले आहे की, ‘जेव्हा पासुन जगभरात टी-२० लीग सुरु झाल्या तेव्हापासुन एकही मोठा खेळाडु काउंटी क्रिकेटचा पुर्ण हंगाम खेळु शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि काउंटी क्रिकेट मध्ये अंतर वाढत असल्याने कसोटी सामन्यात फलंदाजी करताना त्रास होत आहे.’ असे पीटरसन म्हणाला.

न्युझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात इंग्लंडकडुन रॉरी बर्न्स वगळता कोणत्याही दुसऱ्या फलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली नाही. बर्न्स व्यतिरिक्त केवळ डॅन लॉरेन्स हाच अर्धशतक काढू शकला. कर्णधार जो रूट, झॅक क्राऊली, ओली पोप व जेम्स ब्रेसी हे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यामुळे न्यूझीलंड संघाने तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय साजरा केला आहे. तर, इंग्लंडचा संघ २०१३ नंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिकेत पराभुत झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP