fbpx

मनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली

मुंबई: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानला धडा शिकविण्याचा आग्रह होऊ लागला आहे. यापार्श्वभूमीवर टी सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटविण्याचा मोठं निर्णय घेतला आहे. नुकतेच टी सीरिजनं वेगवेगळ्या गाण्यांसाठी राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांच्यासोबत करार केले होते. मात्र मनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं लगेच पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली आहेत.

काल पाकिस्तानी गायकांची गाणी त्वरित यूट्युबवरुन हटवा, असा इशारा मनसेनं म्युझिक कंपन्यांना दिला होता.यानंतर टी सीरिजनं हे पाऊल उचललं आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४० हून अधिक जवान शाहिद झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी असा दिला होता इशारा
‘अजूनही देशातील काही म्युझिक कंपन्या पाकिस्तानी गायकांचे अल्बम्स बनवत आहेत. तसेच पाकिस्तानात गाणी रेकॉर्ड करून भारतात पाठविले जात आहेत आणि त्या गाण्यांवर भारतात प्रक्रिया होते व अल्बम्स निर्मिती केली जाते. पण आता अशा कंपन्यांनी ही कामे ताबडतोब बंद करावीत, अन्यथा त्यांचा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल’